E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचे कारस्थान रचणार्यास अटक
Wrutuja pandharpure
21 May 2025
पुणे
: गुंड शरद मोहोळ याच्या खूनाचा बदला घेण्याचा कट रचणार्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सोमवारी रात्री कोथरूड परिसरातून अटक केली. ओंकार सचिन मोरे (वय-२३, मुठा कॉलनी, सुतारदरा, कोथरुड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंकार मोरे याच्यावर अपहरण, मारामारीचे गुन्हे दाखल असून, तो शरद मोहोळचा साथीदार होता.
शरद मोहोळ याचा मागील वर्षी ५ जानेवारीला कोथरुडमधील सुतारदरा परिसरात त्याच्या घराजवळच पिस्तुलातून गोळ्या झाडून खुन करण्यात आला. वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून मोहोळ याचा खुन झाल्याचे तपासात समोर आले होते. शरद मोहोळ याच्या खुनप्रकरणात गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल पवार, गणेश मारणे, मुन्ना पोळेकर यांच्यासह १० जणांना अटक केली होती. त्यांच्यावर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली असून, सध्या सर्व आरोपी हे येरवडा कारागृहात आहेत.
शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती गुन्हे शाखेला खबर्यांकडून मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी ४ जानेवारी २०२५ रोजी शरद शिवाजी मालपोटे (वय-२९) आणि संदेश लहू कडु (वय-२४, दोघे रा. कोथरुड) यांना खराडी परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून २ पिस्तुल व ७ जिवंत काडतुसे जप्त केली होती. खराडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता. या दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणली असल्याचे समोर आले होते. त्यांच्याकडून आणखी ३ साथीदारांची नावे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांचा शोध गेले काही महिने पोलीस करत होते.
आरोपी ओंकार मोरे हा सुतारदरा परिसरात असून खूनाचा बदल्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना खबर्याकडून मिळाली. त्यावरून पोलिसांनी मोरे याला सुतारदरा येथे पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार ८०० रुपयांचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली. शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आखलेल्या कटातील आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन कांबळे, अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण, नागेश राख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Related
Articles
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश पूर्व परीक्षा मंगळवारपासून
01 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश पूर्व परीक्षा मंगळवारपासून
01 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश पूर्व परीक्षा मंगळवारपासून
01 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश पूर्व परीक्षा मंगळवारपासून
01 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
एनडीएत नवा अध्याय
30 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट